नाना पाटेकर
जन्म – १ जानेवारी १९५१ मृत्यू – ८ ऑक्टोबर २०२६
जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड [ जंजीरा ] गावी. हे आम्हा रायगड वासीयांना उगाच आपले अभिमान वाटण्याजोगे . नाना सा-या महाराष्ट्राचा होता.
त्याने गोव्यात एक घर घेतले आणि तिथे तो जात असे.
पुण्यात एक छोटासा फ्लॅट .
एवढा महान नट , पण अतिशय साध्या पध्दतीत रहायचा .
स्वभावाने सरळ , बोलण्यात स्पष्टवक्तेपणा आणि वागणे स्पष्ट !
मी त्याला पहिल्यांदा पाहिला पुण्यातील ‘ बालगंधर्व ‘ मधे ‘ पाहिजे जातीचे ‘ या नाटकात. तो बबन्या माझ्या अजून लक्षात आहे. बबन्याच काय , नानाची प्रत्येक भुमिका लक्षात आहे .
किती वैविध्य त्या भुमिकांत !
त्याच्या धारदार आणि भेदक आवाजातले संवाद अजून आठवतात. त्यात पण किती वैविध्य !
नाना आणी मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक संस्था काढली. दोघांच्या नांवातील अद्याक्शरांनी तयार झाले संस्थेचे नांव – नाम !
असा हरहुन्नरी नाना आज आमच्यातून गेला.
कधी कुणापुढे हार न मानणारा आमचा नाना मृत्यूपुढे हारला की स्वतः होऊन मृत्यू बरोबर गेला ?
नानाच्या बाबतीत काहिही शक्य आहे !



