Homeताज्या बातम्या सैफवरील हल्ल्याचा गुन्हा कबूल करण्यास आरोपी तयार

 सैफवरील हल्ल्याचा गुन्हा कबूल करण्यास आरोपी तयार

– बांगलादेश दूतावासाशी संपर्काचा न्यायालयाचा आदेश

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेस्थित राहत्या घरी जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणातील बांगलादेशी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने पुन्हा एकदा गुन्हा कबूल करण्यासाठी आणि दयेची याचना करणारा अर्ज सत्र न्यायालयात केला आहे. त्याच्या अर्जाची दखल घेऊन कारागृह प्रशासनाला बांगलादेश दूतावासाशी संपर्क साधण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

घटनेनंतर दोन दिवसांनी अटक केलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शरीफुलने गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता आणि न्यायालयाकडे दयेची विनंती केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी तो अर्ज फेटाळून लावला होता. त्या पार्श्वभूमीवर शरीफुलने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात अर्ज करून गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवली आहे.

गेल्या या महिन्याच्या सुरुवातीला, सत्र न्यायालयाने शरीफुल याच्यावर आरोप निश्चित केले होते, त्यामुळे, त्याच्यावरील खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तथापि, शरीफुल याने पुन्हा एकदा गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments