महाराष्ट्रातील मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या चिरंजीवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची कुटुंबीयांसह भेट घेतली आहे. या भेटी आणि राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा यात काही संबंध आहे, की योगायोग?



